नाव : श्री. विजय नामदेवराव वडेट्टीवार
जन्म : 12 डिसेंबर, 1962.
जन्म ठिकाण : करंजी, तालुका गोंडपिंपरी, जिल्हा चंद्रपूर.
शिक्षण : एच. एस. सी.
ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी व तेलगू.
वैवाहिक माहिती : विवाहित, पत्नी श्रीमती किरण.
अपत्ये : एकूण 4 (एक मुलगा व तीन मुली)
व्यवसाय : शेती व व्यापार.
पक्ष : भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (आय)
मतदारसंघ : 73-ब्रम्हपूरी, जिल्हा चंद्रपूर
इतर माहिती : संस्थापक-अध्यक्ष, सेमाना वन विकास शैक्षणिक संस्थाः विदर्भस्तरीय एकांकिका स्पर्धा, कवि संमेलने, क्रीडा स्पर्धांचे आयोजन; गरीब विद्यार्थ्यांना सर्वतोपरी मदत; शिवसेनेच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीरे, रक्तदान, नेत्रदान. नेत्रचिकित्सा व मोफत चष्मेवाटप शिबीरांचे आयोजन; बेरोजगारांना मार्गदर्शन आणि शेतकरी, शेतमजूर, वन कामगारांच्या न्याय हक्कांसाठी मोर्चे, आंदोलने करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न; गडचिरोली जिल्ह्यातील कारवाफा, तुलतुली, दिना या उपसा सिंचन प्रकल्पांसाठीच्या आंदोलनाचे नेतृत्व पुरग्रस्तांना मदत; दुध उत्पादन व प्रक्रिया केंद्र सुरू करून (शिवाणी डेअरी) गरीब, आदिवासी, शेतकरी यांना गाई-म्हशी उपलब्ध करून रोजगाराची साधने उपलब्ध करून दिली; अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक, संचालक, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक; अध्यक्ष, स्वदेशी कुक्कुटपालन सहकारी संस्था, गडचिरोली; अध्यक्ष, सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण संस्था, गडचिरोली; चिमूर व सिंदेवाही येथे नगरपरिषद स्थापनेसाठी प्रयत्न; गडचिरोली, वडसा (दे), भद्रावती, वरोरा, चंद्रपूर, ब्रम्हपूरी नगरपरिषद निवडणुकीद्वारे शिवसेनेची सत्तेसाठी विशेष प्रयत्न; कुरखेडा, आरमोरी, वडसा, गडचिरोली, चामोशी, धानोरा व मुलचेरा पंचायत समित्यांमध्ये शिवसेनेची सत्ता संपादन केली; गडचिरोली जिल्हा निर्मिती आंदोलनात सहभाग, अटक व कारावासः 1986 पासुन गडचिरोली शिवसेना जिल्हाप्रमुख; 1995-98 अध्यक्ष, वनविकास महामंडळ, या काळात जंगल कामगार, वन मजूर सहकारी संस्थांच्या अडचणी सोडवून तोट्यातील महामंडळ नफ्यामध्ये आणले; शिवसेनेच्या 550 गावात शाखा काढल्याः 1997 पासून गडचिरोली जिल्ह्यातील व चिमूर भागातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळविले; 2005 पासून काँग्रेस पक्षाचे कार्य; सदस्य, जिल्हा परिषद, गडचिरोली; 1998 - 2004 सदस्य, महाराष्ट्र विधानपरिषद; 2004-2009, 2009-2014, 2014-2019 सदस्य, महाराष्ट्र विधानसभा; विधीमंडळाच्या रोजगार हमी, लोकलेखा व आश्वासन समितीचे सदस्य नोव्हेंबर 2009 ते नोव्हेंबर, 2010 जलसंपदा व संसदीय कार्य वित्त व नियोजन आणि ऊर्जा खात्याचे राज्यमंत्री; काही काळ विधानसभेचेविरोधीपक्षाचे काम पाहिले; ऑक्टोबर, 2019 मध्ये महाराष्ट्र विधानसभेवर फेरनिवड.
संदर्भ: 13 वीमहाराष्ट्रविधानसभासदस्यांचासंक्षिप्तजीवनपरिचय